धम्म प्रसारासाठी धम्म मेळावे आयोजित करणे काळाची गरज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:35+5:302021-03-08T04:27:35+5:30
आमगाव : भारत ही बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारताकडे संपूर्ण जग अतिशय आदराने पाहत आहे. बुद्धाने ...
आमगाव : भारत ही बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारताकडे संपूर्ण जग अतिशय आदराने पाहत आहे. बुद्धाने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून समता, स्वातंत्र्य, बंधुता, मैत्री व करुणेचा जगाला महामंत्र दिला. हा महामंत्र जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी व धम्माचा प्रसार करण्यासाठी धम्म मेळावे आयोजित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम तिगाव येथील सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जेतवन बुद्धभूमी परिसरात आयोजित जिल्हास्तरीय बौद्ध धम्म संमेलनात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन भदन्त श्रद्धाबोधी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी सभापती हनुवंत वट्टी, माजी सदस्य अशोक पटले, प्राचार्य महेंद्र मेश्राम, व्यवसायी शंकर भोवते, सामाजिक कार्यकर्ता प्यारेलाल जांभूळकर, चैतराम शेंडे, एल.बी. मेश्राम, मनोहर डोंगरे, हेमलता डोंगरे, आकाश गणवीर, रवींद्र नागपुरे, नमिता बघेले, समितीच्या अध्यक्ष कमला डोंगरे, सचिव निशा मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी श्रद्धाबोधी महाथेरो, प्राचार्य टेंभुर्णे व मान्यवरांच्या हस्ते समाजभवन व वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाथेरो यांनी, ‘बुद्ध धम्म व त्याचे आचरण’ या विषयावर धम्म बांधवांना धम्मदेशना केली. मेंढे यांनी, माणसा-माणसांत मैत्री निर्माण करण्यासाठी व संस्कारशील समाज घडविण्यासाठी बुद्धाच्या विचारांची व धम्माची गरज असल्याचे सांगून समाजभवन व वाचनालयाच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समितीच्या सचिव मेश्राम यांनी मांडले. संचालन संजू बोपचे यांनी केले. आभार मोहम्मद रफिक शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी शकुंतला टेंभुर्णीकर, छाया डोंगरे, आशा मेश्राम, सुनीता राऊत, कांता राहुलकर, किरण टेंभुर्णीकर, कविता टेंभुर्णीकर, गीता नंदेश्वर, शीला मेश्राम, नलू मेश्राम, सुगरता जांभूळकर, ममता नंदा गवळी, संध्या घरडे, अनिता डोंगरे, पंचफुला राऊत, मीरा डोंगरे, नलिना नंदेश्वर व महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.