...अन्यथा त्या व्यापाऱ्यांवर केली जाणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:16+5:302021-06-16T04:38:16+5:30

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व काही होरपळून टाकले आहे. अशात दिवसभरात कित्येक नागरिकांच्या संपर्कात येऊन तेथूनच कोरोनाचा प्रादुर्भाव ...

... otherwise action will be taken against those traders | ...अन्यथा त्या व्यापाऱ्यांवर केली जाणार कारवाई

...अन्यथा त्या व्यापाऱ्यांवर केली जाणार कारवाई

Next

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व काही होरपळून टाकले आहे. अशात दिवसभरात कित्येक नागरिकांच्या संपर्कात येऊन तेथूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ‘सुपर स्प्रेडर्स’ ठरणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगरपरिषदेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नगरपरिषदेने आता व्यापाऱ्यांना दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे, तसेच त्यांना दुकानात निगेटिव्ह अहवाल ठेवावा लागणार आहे. असे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी तोंडावर मास्क, नियमित हात स्वच्छ ठेवणे, तसेच शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक या नियमांचे पालन करीत असून, त्यांना हे सहज शक्यही आहे. मात्र, व्यापाऱ्यांना दिवसभरात कित्येक नागरिकांचा सामना करावा लागत असून, अशात ते बाधित होऊ शकतात व त्यांच्यापासून अन्य नागरिक बाधित होतात. कित्येक ठिकाणी असे घडले असून, यामुळेच व्यापाऱ्यांना ‘सुपर स्प्रेडर्स’ म्हटले जाते. अशात या ‘सुपर स्प्रेडर्स’वर नियंत्रण मिळविता आल्यास कोरोनाचा प्रादुर्भावही आटोक्यात आणणे शक्य आहे.

याकरिता आतानगर परिषदेने शहरातील व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांपासून अन्य नागरिकांत कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने व्यापाऱ्यांसाठी नगरपरिषदेत आरटीपीसीआर चाचणीची सोय केली आहे. येथे व्यापाऱ्यांना दर १५ दिवसांनी त्यांची चाचणी करावयाची आहे. एवढेच नव्हे तर, या व्यापाऱ्यांना त्यांचा निगेटिव्ह अहवाल दुकानात ठेवायचा आहे. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असे आदेशच नगरपरिषदेने काढले आहेत.

----------------------------------

शहरात सुरू आहे मुनादी

व्यापाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने मागील कित्येक दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळत होता. विशेष म्हणजे, दुसऱ्या लाटेत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघाल्याने कंटेन्मेंट झोनच करावे लागले होते. अशात आता हलगर्जीपणा करून चालणार नसल्याने, नगरपरिषदेने यात कठोरता घेतली असून, शहरात मुनादी केली जात आहे.

-------------------------------------

व्यापारी दिवसभरात कित्येकांच्या संपर्कात येतात व त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी त्यांना आरटीपीसीआर करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने यासाठी सोय करून दिली आहे. आता व्यापाऱ्यांनी नियमित चाचणी करून सहकार्य करावे, अन्यथा कारवाई केली जाणार आहे.

- करण चव्हाण

मुख्याधिकारी, नगरपरिषद, गोंदिया.

Web Title: ... otherwise action will be taken against those traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.