क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:20 AM2018-02-14T00:20:32+5:302018-02-14T00:23:48+5:30

बाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार. शिवाय ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते व आरोग्य सुविधा ही आमची प्राथमिकता आहे.

Our efforts to make the area prosperous | क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न

क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बिरसोला-भाद्याटोला रस्ता बांधकामाचे भूमिपूजनबाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार.

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : बाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार. शिवाय ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते व आरोग्य सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. नागरी सुविधांची कामे करून क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दोन कोटीं रुपयांच्या निधीतून मंजूर बिरसोला- भाद्याटोला रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लोकचंद दंदरे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, शामकला पाचे, प्रकाश देवाधारी, देवेंद्र मानकर, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, अशिष चव्हाण, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ.देवा जमरे, कविता दंदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुखनबाई पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Our efforts to make the area prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.