जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:17 PM2018-04-15T22:17:08+5:302018-04-15T22:17:08+5:30

आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, ....

Our first goal is to remove water conservation | जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य

जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : हिवरा येथे पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ८० लाख रूपयांच्या खर्चाचे मंजूर ग्राम हिवरा येथे पेयजल पुरवठा योजनेच्या नवीन जलस्त्रोतांर्गत विहीर व पुरवठा पाईप लाईन बांधकाम, तीन लाखांच्या आमदार निधीतून मंजूर राणी अवंतीबाई स्मारकाजवळ सभामंडप बांधकाम व तीन लाखांच्या निधीतून मंजूर जनसुविधा योजनेंतर्गत स्मशान रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होते. अतिथी म्हणून जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स. उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, सरपंच सजिव लिल्हारे, उपसरपंच विशाल साखरे, ग्रा.पं. सदस्य फुलचंद बन्नोटे, श्वेता वंजारी, माधुरी धारणे, प्रमिला भास्कर, तरूणा साखरे, सरोज लिल्हारे, कनेरलाल पिसोडे, राजेशसिंग परिहार, पोलीस पाटील विनोद नंदेश्वर, फागुलाल माहुले, सूर्यभान टेंभुरकर, सुखदेव ढोमणे, डॉ.एम.बी. ठाकरे, तेजलाल गहगये, जिवनलाल लिल्हारे, अरविंद धमगाये, रंजित नंदेश्वर, श्यामकुवर अंबादे, आनंद बनोटे, राजेंद्र दरवडे, खिमनलाल माहुले, साहेबलाल पिसोडे, मनोहरलाल पिसोडे, शिवचरण पिसोडे, मनोज शहारे, खुमेश ठाकरे उपस्थित होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कार्यांसहच पाणी पुरवठ्यासाठी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा मिळाव्या यासाठी बाघ प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांचे दुरूस्ती कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भविष्यात या सर्व कालव्यांतून प्रत्येक शेतकºयाला सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत.
रस्त्यांच्या विकासावर बोलताना ते म्हणाले, रस्त्यांच्या विकासाकडे आमचे सर्वाधिक लक्ष असते. जेथे रस्ते नाही, तेथे नाते नाही व रस्त्यांच्या माध्यमातूनच परिसरात समृद्धी येते, असे त्यांनी सांगितले.
या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी म्हणाल्या, सतत विकास कामे आणून या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याचे आ. अग्रवाल यांचे धोरण आहे. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली आहे.
राज्यात कोणत्याही पक्षाची सरकार असो, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासाची गती थांबली नाही. राज्य व केंद्र शासनाच्या विकासाच्या योजनांना शासनाशी संघर्ष करून आपल्या क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचविल्या, असे त्या म्हणाल्या.
या वेळी सरपंच संजिव लिल्हारे, धनलाल ठाकरे यांनीसुद्धा आपल्या मार्गदर्शनात आ. अग्रवाल यांनी केलेल्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला.

Web Title: Our first goal is to remove water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.