युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:24 PM2018-12-03T21:24:47+5:302018-12-03T21:24:59+5:30

भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

Our goal is to develop the art skills of the youth | युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय

युवकांच्या कलागुणांचा विकास हेच आमचे ध्येय

Next
ठळक मुद्देविजय रहांगडाले : तालुकास्तरीय सीएम चषकचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय व आॅलम्पीक स्पर्धेत टिकावेत त्यासाठी तळागाळातील व खेड्यातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सीएम चषक घेण्यात येत आहे. यात तालुका, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्र स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये युवकांच्या कलागुणांचा विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
तालुकास्तरीय सीएम चषकच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. यावेळी आमदार भजनदास वैद्य, हरिष मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, आशिष बारेवार, जिल्हा संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, विजय डिंकवार, उमाकांत हारोडे, डॉ. वसंत भगत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले, भाऊराव कठाणे, चित्ररेखा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष पटले यांनी, भाजपाच्या काळात तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून आपले लाडके आमदार त्यासाठी सतत पाठपुरावा करीत असल्याचे सांगीतले. यावेळी दोन गटात कबड्डीचा सामना घेण्यात आला. त्यात दोन्ही चमुंना प्रोत्साहनपर एक-एक हजार रुपयांचे पारितोषिक आ. रहांगडाले यांच्या हस्ते देण्यात आले. संचालन अनुप बोपचे यांनी केले. प्रास्ताविक पुष्पराज जनबंधू यांनी मांडले. आभार ओम कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गौरी पारधी, शितल तिवडे, अनंता ठाकरे, बंटी श्रीबांसरी, निरज सोनेवाने, बालू समरीत, रेवेंद्र बिसेन, अमित पारधी, संजू पारधी, सारंग मानकर, स्वानंद पारधी, डिलेश पारधी तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Our goal is to develop the art skills of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.