शाळाबाह्य मुलांचे आज सर्वेक्षण

By admin | Published: July 4, 2015 02:05 AM2015-07-04T02:05:14+5:302015-07-04T02:05:14+5:30

शाळाबाह्य मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा शोध घेण्याचे काम शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत केले जाणार आहे.

Out-of-school children survey today | शाळाबाह्य मुलांचे आज सर्वेक्षण

शाळाबाह्य मुलांचे आज सर्वेक्षण

Next

गोंदिया : शाळाबाह्य मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा शोध घेण्याचे काम शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या कामात १० हजार ४३४ कर्मचारी सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
आमगाव तालुक्यातील २७ हजार ५८२ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ४७२ सर्वेक्षण अधिकारी, २५ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३६ हजार ८९० कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३४५ सर्वेक्षण अधिकारी, १७ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. देवरी तालुक्यातील २६ हजार २२ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २९४ सर्वेक्षण अधिकारी, १५ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे.
गोंदिया तालुक्यातील ८३ हजार ८१८ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी १०३५ सर्वेक्षण अधिकारी, ४४ झोनल आॅफीसर व वर्ग एकचे ३ नियंत्रक सर्वेक्षण करणार आहेत. गोरेगाव तालुक्यातील २६ हजार १०७ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३१२ सर्वेक्षण अधिकारी, १६ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील २४ हजार ८५० कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २६५ सर्वेक्षण अधिकारी, १३ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे.
सालेकसा तालुक्यातील १८ हजार ६६ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २२३ सर्वेक्षण अधिकारी, १२ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. तिरोडा तालुक्यातील ३५ हजार ९४९ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ४३५ सर्वेक्षण अधिकारी, २३ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. या शिवाय प्रत्येक सर्वेक्षण अधिकाऱ्यासोबत एक अंगणवाडी सेविका व एक आशा स्वयंसेविका राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out-of-school children survey today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.