४० हजारांवर बाधितांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:44+5:302021-06-11T04:20:44+5:30
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांचा आलेख वाढत गेला. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात ४१००२ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ४०,०४२ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत केवळ २६४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहेे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन आता पंधरा महिन्यांच्या कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत कोरोनाचा ग्राफ कधी खाली, तर कधी वर झाला. जिल्ह्याच्या दृष्टीने मागील वर्षी सप्टेंबर आणि यंदा एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्हावासीयांसाठी अधिक घातक ठरली. दुसऱ्या लाटेत ३० हजारांवर रुग्ण आणि ४५० रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र दिलासादायक बाब म्हणजे ४० हजारांवर बाधितांनी मात केली आहे, तर आता दुसरी लाट पूर्णपणे ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१०) ३६ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १९ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गच्या अनुषंगाने आतापर्यंत १,७४,८७५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,४९,१५५ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,७६,०९५ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,५५,१८४ नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत ४१,००२ कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ४०,०४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २६४ कोरोना ॲक्टिव्ह असून, ७३४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
................
३८६४ चाचण्या १९ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्ह्यात १००३ आरटीपीसीआर आणि २८६१ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. एकूण ३८६४ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १९ नमुने पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझटिव्हिटी रेट ०.४९ टक्के आहे. मागील आठ दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट १ टक्केच्या आतच असल्याने कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात येत असल्याचे चित्र आहे.
.....................
लाट ओसरतेय, पण नियमांकडे दुर्लक्ष नको
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच व्यवहार आता सुरळीत होत आहे. मात्र कोरोनाची लाट ओसरली म्हणून नागरिक बिनधास्तपणे वागत आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष न करता नियमांचे पालन करा. अन्यथा ते आपल्या जिवावर बेतू शकते.