अतिवृष्टीने तालुक्यात ८.३२ लाखांचे नुकसान

By admin | Published: September 18, 2016 12:36 AM2016-09-18T00:36:59+5:302016-09-18T00:36:59+5:30

आमगाव तालुक्यातील चार मंडळात १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत १४३ घर व गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

Over 8.32 lakh losses in the talukas | अतिवृष्टीने तालुक्यात ८.३२ लाखांचे नुकसान

अतिवृष्टीने तालुक्यात ८.३२ लाखांचे नुकसान

Next

चार मंडळात जास्त हानी : १४३ घरे व गोठे ढासळले
आमगाव : आमगाव तालुक्यातील चार मंडळात १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत १४३ घर व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत ८ लाख ४० हजारांचे हाणी झाल्याची माहिती तहसीलदार साहेबराव राठोड यांनी दिली आहे.
आमगाव तालुक्याच्या तिगाव, आमगाव कट्टीपार व ठाणा या चार मंडळात १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत आमगाव तालुक्यातील १११ घरे अंशत: पडली. ३२ गोठे ही पडले. या १४३ घर व गोठ्यांचे ८ लाख ३२ हजार १०० रूपयाचे नुकसान झाल्याचा आढावा तहसील कार्यालयाने तयार केला आहे. एक बकरी किंमत ७५०० ची मृत्यू पावली आहे. या नुकसानाग्रस्तांना लवकरच शासनाच्या आपादग्रस्त निधीतून मदत दिली जाणार आहे. यंदा आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस आला. परंतु अतिवृषञटी झाली नव्हती. मात्र सप्टेंबर महिन्यात १० तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे या घरांची पडझळ झाली आहे. त्यामुळे या आपादग्रस्तांना मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. तहसीलदार साहेबराव राठोड यांनी अतिवृष्टीच्या दिवशी बहुतांश ठिकाणी स्वत: उपस्थित राहून पाहणी केली. कुणीही मदतीपासून वंचीत राहू नये किंवा कुणाचे बोगस नाव या मदत यादीत येऊ नये यासाठी त्यांनी प्रत्यक्षात अने ठिाणी भेटी दिल्यात. तहसील यांच्या भेटीमुळे आपादग्रस्तांना मदत मिळेल अशी आशा पल्लवीत झाली. (तालुका प्रतिनिधी)

अतिवृष्टीत ज्यांचे नुकसान झाले त्या नुकसानीचे योग्य मुल्यमापन करून त्यांना मदत देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नुकसान झालेल्यांना लवकरच मदत देऊ.
-साहेबराव राठोड
तहसीलदार आमगाव

Web Title: Over 8.32 lakh losses in the talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.