एका बाधिताची मात तर एका रुग्णाची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:16+5:302021-08-22T04:32:16+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच एक एक रुग्ण वाढत असल्याने धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याचे चित्र आहे. ...

Overcome an infection and reduce a patient's fall | एका बाधिताची मात तर एका रुग्णाची पडली भर

एका बाधिताची मात तर एका रुग्णाची पडली भर

Next

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच एक एक रुग्ण वाढत असल्याने धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीइतकेच सतर्क राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. २१) ३२९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ४३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १ नमुना कोरोना बाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३० टक्के आहे. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीनवर आली आहे. तर आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चित दिलासादायक बाब आहे. संसर्ग आटोक्यात आला असला तरी इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी पूर्वीइतकीच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,४३,६२७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २,२४,८४६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१८,७८१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,१९८ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०,४९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

..............

लसीकरणाचा ७ लाखांचा टप्पा पूर्ण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लसीकरणावर शासन आणि प्रशासनाकडून भर दिला जात आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे असून, त्यापैकी आतापर्यंत ७ लाख ८ हजार ७५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ५,५१,८८७ नागरिकांना पहिला तर १,५६,८७२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाची टक्केवारी ५३.५ टक्के आहे.

............

Web Title: Overcome an infection and reduce a patient's fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.