योग्य समन्वयानेच आपत्तीवर मात

By Admin | Published: January 21, 2017 12:17 AM2017-01-21T00:17:21+5:302017-01-21T00:20:38+5:30

आगीपासून जीवित हानी टाळण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे,

Overcoming disaster by appropriate coordination | योग्य समन्वयानेच आपत्तीवर मात

योग्य समन्वयानेच आपत्तीवर मात

googlenewsNext

जिल्हाधिकारी काळे : आग सुरक्षा माहिती व प्रशिक्षण कार्यशाळा
गोंदिया : आगीपासून जीवित हानी टाळण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आग सुरक्षा माहिती व प्रशिक्षण कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गुरूवारी १९ जानेवारीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, गोंदिया येथील हॉटेल बिंदल प्लाझाला २१ डिसेंबरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत सात व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी प्रशासन व नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून अदानी पॉवर लिमिटेडकडे असलेल्या आधुनिक आग प्रतिबंधक उपकरणासारखे उपकरणे गोंदिया अग्निशमन दलासाठी खरेदी करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून नागरिकांनी एकमेकांच्या सहकार्यातून उपाययोजना करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भूजबळ म्हणाले, अग्निशमन दल व बचाव पथकाकडे विशिष्ट गणवेश असला पाहिजे. विशिष्ट पेहरावामुळे इतरांची मदत घेणे देखील सोपे होते. आगीवर नियंत्रण करण्यासाठी त्यांच्याकडे आधुनिक उपकरणे व साहित्य असले पाहिजे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. प्रत्येक हॉटेल, लॉज, प्रतिष्ठान व संस्था यांनी देखील स्वत:चे फायर आॅडीट केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध हॉस्पीटल्स, हॉटेल्स, लॉज, व्यापारी संकुल, विविध प्रतिष्ठाने यांचे संचालक, शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, व्हाईट आर्मीचे युवक, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, होमगार्डस, नगरपालिकांचे कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात आली.
कार्यक्रमासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परीविक्षा अधिकारी प्रवीणकुमार, मंडळ अधिकारी कोल्हटकर, अधीक्षक अरमरकर, बावीसकर, राजेश मेनन, संजय सांगोळे, चिचघरे, किरीमकर, एस.सी. धार्मिक, होमगार्ड इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, डी.वाय. पटले यांनी सहकार्य केले. संचालन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले. (प्रतिनिधी)

प्रात्यक्षिक व मार्गदर्शन
यावेळी अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्र तिरोडाचे अग्निग्नशमन विभागाचे प्रमुख त्रिलोकिसंग यांनी आपत्ती व त्यांचे प्रकार, आगीच्या वेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व आत्मसुरक्षा, फायर सेफ्टीच्या दृष्टीकोनातून आग प्रतिबंधक मानके, महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायदा, फायर संयंत्र व फायर आॅडीटची आवश्यकता याबाबतची माहिती त्यांनी सादरीकरणातून दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षणाला उपस्थितांना आॅईल फायरचे प्रात्यिक्षक गोंदिया नगरपरिषद अग्निग्नशमन दलाच्या वतीने दाखिवण्यात आले. आॅईलने लागलेल्या आगीवर होम फायरने कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येते, हे उपस्थितांनी बघितले. यासाठी गोंदिया नगरपरिषदेचे अग्निग्नशमन अधिकारी कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यिक्षके सादर केली.

 

Web Title: Overcoming disaster by appropriate coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.