गाळाचा उपसा केल्यास पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:02+5:30

खरीप व्यतिरिक्त रब्बी, उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठ्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंचीपर्यंत आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी.पर्यंत असते. पांगोली नदीवरील या विभागाव्दारे निर्मित कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यापासून जवळपास ७८८ हेक्टर क्षेत्रात ओलिताखाली आहे. 

Overcoming water scarcity by removing silt | गाळाचा उपसा केल्यास पाणीटंचाईवर मात

गाळाचा उपसा केल्यास पाणीटंचाईवर मात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया  :  पांगोली नदीपात्रातून साचलेला गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध होईल. परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. याकरिता प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू असून शासनाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे. 
पांगोली नदीचे उगम तेढा, ता. गोरेगाव येथे झालेला असून छिपीया गावाजवळ बाघ नदीला संगम होतो. या नदीवर मृद व जलसंधारण विभाग गोंदिया मार्फत तुमखेडा, चुलोद, टेमणी, खातीया, को.प.बं. कामठा व पांजरा (गिरोला) असे एकूण ६ कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे तयार करण्यात आले. लंबाटोला, गिरोला, पांजरा, कामठा, नवरगाव कला, नवरगाव (बु.), खातिया, बरबसपुरा, टेमणी, बटाणा, आंभोरा व परिसरातील शेतकरी या बंधाऱ्यापासून सिंचनाकरिता नियमित पाण्याचा वापर करतात. खरीप व्यतिरिक्त रब्बी, उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठ्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंचीपर्यंत आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी.पर्यंत असते. पांगोली नदीवरील या विभागाव्दारे निर्मित कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यापासून जवळपास ७८८ हेक्टर क्षेत्रात ओलिताखाली आहे. 
नदीपात्रात अडवलेल्या पाण्यापासून परिसरात पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच जनावरांसाठीसुद्धा पाण्याचा वापर करण्यात येत असतो. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा वापर करता येतो.

पुराचा धोका होणार कमी 
- पांगोली नदीच्या पात्रातून गाळ काढणे व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यास नदीत आवश्यक तेवढा पाणी प्रवाह राहील. साचलेला गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण केल्यास नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई दूर होऊन पर्यायाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध होईल व परिसरातील गावांना पुराचा धोका कमी होईल. 

नदीकाठावर करणार वृक्ष लागवड 
पांगोली नदीच्या उगम व संगमापर्यंत एकूण ५९ बंधाऱ्यांचे बांधकाम झालेले आहे. या नदीच्या लगत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना नदीकाठावर शक्य असल्यास वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रमाणे उगम ते संगमापर्यंत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येत असून, येणाऱ्या काळात पांगोली नदी एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंका नसल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप यांनी सांगितले. 

पाणीपातळीत १ मीटरने वाढ 
याच नदीवर सन २०२०-२१ मध्ये जुन्या निरुपयोगी पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर हे काम करण्यात आलेले होते. प्रचलित रचना व पारंपरिक पध्दतीने बांधकाम केल्यास या कामाचा अंदाजित खर्च ३ कोटी अपेक्षित होता. हे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत (नवीन्यपूर्ण) पध्दतीने २१ लक्ष रुपयांत पूर्ण केले. छोटा गोंदिया परिसरात बंधाऱ्यालगत जवळपास १.०० मीटर खोलीचे पाणी उपलब्ध आहे. छोटा गोंदिया तसेच चुलोद भागातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

मासेमारीला मिळणार वाव 
- पांगोली नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास गती दिली गेल्यास इतरदेखील फायदे आहेत. नदीत पाणीसाठा उपलब्ध असल्यास स्थानिक मच्छीमारांनासुध्दा उपयोगी येऊ शकतो. परिसरातील परंपरागत वीटभट्टी कामगारास वीटभट्ट्या व्यवसायासाठीसुध्दा पाण्याचा वापर होऊ शकतो. हे सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यास पाणी साठवण क्षमतेत वाढ होईलच व त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पिकाकरिता ओलिताची सोय, पर्यायाने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल.

 

Web Title: Overcoming water scarcity by removing silt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.