नुकसान भरपाईची जबाबदारी मालकाची

By admin | Published: May 6, 2017 12:54 AM2017-05-06T00:54:36+5:302017-05-06T00:54:36+5:30

देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.

The owner's responsibility to compensate | नुकसान भरपाईची जबाबदारी मालकाची

नुकसान भरपाईची जबाबदारी मालकाची

Next

ए.एस.जरु दे : कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदेही तयार करण्यात आले आहे, त्यापैकीच एक कायदा कामगार नुकसान भरपाईचा असून या कायदयाअंतर्गत कामाच्या ठिकाणी किंवा कामावर जातांना दुर्घटना झाल्यास पिडीत कामगारास किंवा त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची आहे, असे प्रतिपादन न्या.ए.एस.जरु दे यांनी केले.
येथील एसटी आगारात कामगार दिनानिमित्त सोमवारी (दि.१) आयोजीत कायदेविषयक जनजागृती कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून न्या.वासंती मालोदे, आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, आगाराचे कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे व सहायक वाहतूक अधिकारी संजना पटले प्रमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी न्या.मालोदे यांनी, कंत्राटी कामगार अधिनियम १९७० नुसार कामगारांना सर्वप्रकारच्या सुविधा नियोक्त्याने पुरविणे बंधनकारक आहे. या कायद्यांतर्गत जोखमीच्या ठिकाणी १४ वर्षाखालील बालकांना कामावर घेण्यास प्रतिबंध आहे. कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी, कामाचा योग्य मोबदला दिला पाहिजे असे सांगत कामगाराच्या हिताच्या दृष्टीने असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकातून झाडे यांनी, कोणत्याही कामागारावर अन्याय झाला असेल तर त्याने न्याय मागण्यासाठी न्यायालयात अवश्य जावे. न्यायासाठी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. संचालन करून आभार अ‍ॅड.श्रीमती एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले. कार्यक्र माला एसटी आगारातील अनेक कामगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बस आगारातील सुरेंद्र भिमटे, विठ्ठल राणे, मनिषा धोटे, सुजित डोंगरे, अर्पित वासनिक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील अधीक्षक एस.जी.कान्हे, जी.एस.ठवकर, एस.यु.थोरात, डी.ए.थोरात व आर्यचंद्र गणवीर यांनी सहकार्य केले.

Web Title: The owner's responsibility to compensate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.