कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले, दीड लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 09:57 AM2019-12-07T09:57:47+5:302019-12-07T09:57:54+5:30

गेल्या काही दिवसांपासून चिचगड परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आगी लावून नुकसान करण्याचे प्रकार घडत आहेत.

Paddy burnt at Kotjambura, loss of 1.5 lakh of farmer in gondia | कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले, दीड लाखांचे नुकसान

कोटजांभूरा येथे धानाचे पुंजणे जाळले, दीड लाखांचे नुकसान

Next

गोंदिया - चिचगड-देवरी तालुक्यातील धानाचे पुंजणे जाळण्याचा प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. काल शुक्रवार (दि.6) च्या रात्री धानाचे पुंजणे जाळण्याच्या घटनेत आणखी भर पडली. चिचगड परिसरातील कोटजांभूरा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे काही अज्ञात समाजकंटकांनी जाळून 1 लाख 72 हजाराचे नुकसान केले. परिणामी, शेतकऱ्यामध्ये कमालीची धास्ती पसरली आहे.

सविस्तर असे की, गेल्या काही दिवसांपासून चिचगड परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांना आगी लावून नुकसान करण्याचे प्रकार घडत आहेत. आधीच निसर्गाचा प्रकोप सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर या प्रकारामुळे आणखी मनस्ताप सहन करावे लागत आहे. गरीबीत फरफट होत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचे महापाप काही

समाजकंटकाकडून होत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या श्रृंखलेत काल शुक्रवारी कोटजांभूरा येथील किसन चनाप, फगन बागडेहरिया आणि भिकाम जुडा या आदिवासी शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजण्यांना आग लावून 1 लाख 71 हजार 732 रुपयांचा नुकसान केल्याचा अहवाल तलाठ्याने शासनाला सादर केला आहे. यामध्ये 2 हेक्टर 60 आर क्षेत्रातील भातपिकाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. या सतत घडणाऱ्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून या घटनेचा छडा लावण्याची विनंती शेतकऱ्यांनी शासन-प्रशासनाला केली आहे.
 

Web Title: Paddy burnt at Kotjambura, loss of 1.5 lakh of farmer in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.