आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती करावी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:23+5:302021-06-24T04:20:23+5:30
साखरीटोला : सध्याच्या वातावरणात खरीप हंगामातील पावसाच्या अनियमिततेमुळे भाताची शेती अडचणीत येत आहे. शेतकऱ्यांनी भरलेली रोपे (खार) ...
साखरीटोला : सध्याच्या वातावरणात खरीप हंगामातील पावसाच्या अनियमिततेमुळे भाताची शेती अडचणीत येत आहे. शेतकऱ्यांनी भरलेली रोपे (खार) पावसाच्या अनियमिततेमुळे सुकून मरतात व त्यांना दुबार पीक पेरणी करावी लागते. यासाठी ड्रम सिडरच्या माध्यमातून भात शेती करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दुधाने यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील ग्राम सलंगटोला येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक डी.व्ही. ठाकरे, आत्माचे एस.आर. पुस्तोडे, कार्यक्रमाचे आयोजक कृषी सहाय्यक सुभाष नागदेवे उपस्थित होते. कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी विनोद दोनोडे यांच्या व माधोराव आसोले यांच्या शेतात ड्रम सिडर यंत्राने भात लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.