धान खरेदीची नियमावली कागदावरच

By admin | Published: November 22, 2015 01:57 AM2015-11-22T01:57:08+5:302015-11-22T01:57:08+5:30

जिल्ह्यात उशिरा का होईना काही धान खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र हमीभावाने शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करताना ....

Paddy procurement rules on paper | धान खरेदीची नियमावली कागदावरच

धान खरेदीची नियमावली कागदावरच

Next

शेतकऱ्यांची सर्रास लूट : इलेक्ट्रॉनिक काटेच नाहीत, काट्यांची तपासणीही नाही
गोंदिया : जिल्ह्यात उशिरा का होईना काही धान खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र हमीभावाने शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करताना संबंधित सहकारी संस्था आणि मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून केवळ व्यापाऱ्यांना फायदा होईल असे धोरण राबवित स्वत:चा स्वार्थ साधणे सुरू आहे. शासनाने घालून दिलेल्या अनेक नियमावलींचे पालनच होत नसून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होत असून ते भरडल्या जात आहेत.
वजनकाट्यात दांडी मारल्या जात असल्यामुळे शक्यतोवर सर्व खरेदी केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे वापरावेत असे निर्देश आहेत. मात्र बहुतांश केंद्रांवर अजूनही जुन्याच काट्यांनी वजन केले जात आहे. विशेष म्हणजे खरेदी सुरू करण्यापूर्वी हे काटे दरवर्षी वजन मापे विभागाकडून प्रमाणित करून घेणे गरजेचे असताना कोणत्याही संस्थांनी ही तसदी घेतलेली नाही. असे असताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी त्याबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही. व्यापाऱ्यांचा सातबाऱ्याशिवाय मोठ्या प्रमाणात धानाचा साठा करून ठेवून नंतर तो शेतकऱ्यांचे सातबारे आणून त्यांच्या नावावर दाखविल्या जात असल्याचा प्रकार माजी कृषी सभापती अशोक लंजे, बाजार समितीचे संचालक रोषण बडोले, राजेंद्र परशुरामकर, सचिव संजय पुस्तोडे, बाबूराव यावलकर यांनी मार्केटींग अधिकारी खर्चे यांना सौंदड येथील केंद्रात लक्षात आणून दिला. पण त्यांनी ही बाब विशेष गांभिर्याने घेतली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Paddy procurement rules on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.