राबराब राबूनही धान कमी झाले, शेतकऱ्याची आत्महत्या
By नरेश रहिले | Published: December 6, 2023 05:13 PM2023-12-06T17:13:07+5:302023-12-06T17:14:35+5:30
आर्थिक विवंचन्त असलेल्या शेतकऱ्याने चक्क शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंंदियात घडली आहे.
नरेश रहिले,गोंदिया: शेतात राबराब राबूनही अंगावर वाढते कर्ज आणि होणारे उत्पन्न कमी यातून संसाराचा गाडा कसा रेटायचा या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने चक्क शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. शामराव दामा भोगारे (५०) रा. मगरडोह गोंडीटोला असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरवर्षी ते धानाचे उत्पादन घेतात.
दरवर्षीपेक्षा यंदा धानाचे कमी उत्पादन झाले. त्यातून आपण वर्षभर संसार कसा करणार या विंवचनेत असलेल्या शामराव यांनी ५ डिसेंबर रोजी आपलञया शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेतली. आशिष शामराव भोगाळे (१९) रा. मगरडोह यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी तक्रारीवरून आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार मसराम करीत आहेत.