कागदी पिशव्या, पेपर बॅग डे साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:05+5:302021-07-13T04:07:05+5:30
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, ...
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे किती गरजेचे आहे, याची जागरुकता समाजात व विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला. संस्था उपाध्यक्ष नंदिनी भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना व महिला बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्याचे व रिना बिसेन यांनी कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. पिशव्या तयार करण्यासाठी रंगीत पेपर, ब्राऊन पेपर व बातमी पत्रांचा उपयोग करुन सुंदर पिशव्या महिलांनी व विद्यार्थ्यांनी तयार केल्या. उत्तम कागदी पिशव्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थाध्यक्ष वर्षा भंडारकर यांनी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून असे उपक्रम राबविणे ही महत्वाची बाब आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जागृती ही काळाची गरज झालेली आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात अश्विनी फाये, कोमल बचत गट, लाडली बचत गटाच्या सुशीला कोठेवार, मॉ जिजाऊ आदिवासी महिला बचत गटाच्या ज्योती कोठेवार, रिना बिसेन, शिव भांडारकर, निशू कोठेवार, साक्षी, परी, समीक्षा, रोहित, पियूष, नैतिक इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पिशव्यांच्या वापराने आपला देश नक्कीच एक दिवस प्लास्टिकमुक्त होईल व प्रदूषणाला आळा बसेल. यासाठी विद्यार्थ्यांनी जागृती करीत काही पिशव्या औषधी विक्रेत्यांना व काही दुकानदारांना देण्यात आल्या.