गोंदिया जिल्ह्यात घरावर पडले 'पॅराशूट'; भारतीय हवामान खात्याचे असल्याचा निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:27 AM2020-04-08T10:27:40+5:302020-04-08T10:28:16+5:30
गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास एका घरावर पॅराशूटसदृश वस्तू पडल्याने नागरिकांत संभ्रम व घबराट निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास एका घरावर पॅराशूटसदृश वस्तू पडल्याने नागरिकांत संभ्रम व घबराट निर्माण झाली.
चिचगाव येथील रहिवासी दखणे यांच्या घरावर सकाळी ७ च्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज आला. घरावर काय पडले ते पाहण्यासाठी गच्चीवर गेले असता, मोठ्या आकाराचा पॅराशूटसारखा पांढऱ्या रंगाचा फुगा पडलेला दिसला.
याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी ते तपासले. त्यात दोन वेगवेगळ्या किट आढळून आल्या. त्यातील एकावर मौसम विभाग के महानिदेशक का कार्यालय, भारत मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली असे लिहिलेल आढळले. यावरून हे पॅराशूट भारतीय हवामान खात्याचे माहिती दर्शक उपक्रमाचे साधन असावे असे लक्षात आले.