नागालॅंड येथील चकमकीत परसोडीचे प्रमोद कापगते शहीद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:10+5:302021-05-26T04:30:10+5:30
प्राप्त माहितीनुसार प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील रहिवासी होत. त्यांचे कुटुंबीयसुद्धा सध्या परसोडी ...
प्राप्त माहितीनुसार प्रमोद कापगते हे मुळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील रहिवासी होत. त्यांचे कुटुंबीयसुद्धा सध्या परसोडी येथेच वास्तव्यास आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे ते सुपुत्र होत. प्रमोद कापगते हे बीए अंतिम वर्षाला असताना सन २००१ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात पूर्ण झाले. मागील २० वर्षांपासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. सीआरपीएफमधील त्यांचा २० वर्षांचा बॉंड सुध्दा पंधरा दिवसांनी पूर्ण होणार होता. मात्र, मंगळवारी नागालॅंड बार्डवर झालेल्या चकमकी दरम्यान त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरसुध्दा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाला कापगते, भाऊ राजेश कापगते व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहीद प्रमोद कापगते यांचा मृतदेह २७ मे रोजी सकाळी सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथे पोहोचणार असून त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.