आईबाबा, मला मिळणार आता दोन गणवेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:54+5:302021-09-19T04:29:54+5:30

नरेश रहिले गोंदिया : मोफत गणवेश योजनेतून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ...

Parents, I'll get two uniforms now! | आईबाबा, मला मिळणार आता दोन गणवेश !

आईबाबा, मला मिळणार आता दोन गणवेश !

Next

नरेश रहिले

गोंदिया : मोफत गणवेश योजनेतून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना गणवेश देण्यात येतो. समग्र शिक्षा वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक सन २०२१-२२ करिता भारत सरकारने गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार ४१६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी चार कोटी ५२ लाख ४९ हजार ६०० रुपये मंजूर केले आहेत. हे पैसे लवकरच समग्र शिक्षा अभियानाला मिळणार असून, आठवडाभरात हे पैसे त्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशासाठी राज्यात ३६ लाख ७ हजार २९२ विद्यार्थ्यांकरिता प्रती गणवेश ३०० रुपये या दराने दोन गणवेशाकरिता ६०० रुपये प्रती विद्यार्थी देण्यात येत आहेत. जिल्ह्यात गणवेशासाठी ७५ हजार ४१६ विद्यार्थी पात्र आहेत. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून अनुदान जिल्हा स्तरावरून थेट शाळा व्यवस्थापन समितीला वितरित केले जाणार आहे.

.........

बॉक्स

‘त्या’ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ नाही

राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभागामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, एकाच विद्यार्थ्यास दुबार गणेवशाचा लाभ देता येणार नाही. गणवेश पुरवठ्याबाबत संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस आहे.

.........

कोट

शासनाने ७५ हजार विद्यार्थ्यांसाठी निधी मंजूर केला आहे. निधी दोन दिवसांत मिळेल. निधी आल्यास लगेच तो निधी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वळता करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जाणार आहेत.

- दिलीप बघेले, सहायक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा जि. प. गोंदिया.

Web Title: Parents, I'll get two uniforms now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.