शिक्षकांसोबतच पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:05 PM2018-10-07T22:05:18+5:302018-10-07T22:05:58+5:30
सर्व शिक्षक विद्यार्थ्याना शिकवित असतांना वर्गातील सर्व मुलांना समान दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत असतात. पण जे पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देतात ते पाल्य चांगल्या गुणांनी पास होतात. यामुळे शिक्षकांसोबतच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे विशेक्ष लक्ष द्यावे असे प्रतिपादन उपसरपंच महेंद्र शहारे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्व शिक्षक विद्यार्थ्याना शिकवित असतांना वर्गातील सर्व मुलांना समान दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत असतात. पण जे पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देतात ते पाल्य चांगल्या गुणांनी पास होतात. यामुळे शिक्षकांसोबतच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांकडे विशेक्ष लक्ष द्यावे असे प्रतिपादन उपसरपंच महेंद्र शहारे यांनी केले. जवळील ग्राम कारंजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजीत आयोजित पालक सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शा.व्य.समितीचे अध्यक्ष विजय बनोठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दिनेश रहमतकर, शा.व्य.समितीच्या उपाध्यक्ष रितू हजारे, सुलोचना शेंडे, किरण रंगारी, गुलाब लिचडे, पालक म्हणून कपिल हरडे व मुख्याध्यापिका छाया कोसरकर उपस्थित होत्या. सभेच्या अनुषंगाने पालकांनी शाळा व पाल्यांबद्दल समस्या मांडल्या. त्यांनी मांडलेल्या समस्यांची उकल मुख्याध्यापक व शिक्षकांनी केली. एल.यू.खोब्रागडे यांनी शाळेत होत असलेल्या विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य, भौतिक सुविधा, शिक्षक कमतरता व शासनाला देण्यात येणारी दररोजची संपूर्ण माहिती विशद केली. प्रास्तावीक मुख्याध्यापक कोसरकर यांनी मांडले.
संचालन एम.टी.जैतवार यांनी केले. आभार नरेश बडवाईक यांनी मानले. पालक सभेला मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. सभेसाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.