पालकांनी विद्यार्थ्याचा पाया मजबूत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:18 PM2018-02-01T22:18:55+5:302018-02-01T22:19:23+5:30
भविष्याच्या काळातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्याकरीता या ईवल्यासा बाल मनावर आतापासूनच उत्कृष्ट शिक्षण देऊन घडवायला पाहिजे. येणारा काळ स्पर्धेचा काळ राहणार आहे. त्यामुळे पालकांनाही आता शाळेतील शिक्षण प्रणालीला तपासण्याची गरज आहे.
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : भविष्याच्या काळातील जीवघेण्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा टिकाव लागण्याकरीता या ईवल्यासा बाल मनावर आतापासूनच उत्कृष्ट शिक्षण देऊन घडवायला पाहिजे. येणारा काळ स्पर्धेचा काळ राहणार आहे. त्यामुळे पालकांनाही आता शाळेतील शिक्षण प्रणालीला तपासण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सजग राहून आतापासूनच विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करायला पाहिजे असे प्रतिपादन रेत प्रयोगशाळेचे (नागपूर) डॉ. अजय पोहरकर यांनी केले.
नवेगावबांध येथील आरुषी पब्लिक स्कूलमधील वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन डॉ. अभिमन कापगते यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य यशवंत परशुरामकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊराव पत्रे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उजवने, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्था सचिव एकनाथ बोरकर यांनी मांडले. त्यानंतर मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले. या वार्षिकोत्सवासाठी संस्थाध्यक्ष वैशाली बोरकर, प्राचार्य धनपाल शहारे, लिटील स्टार कॉन्व्हेंटच्या प्राचार्य अर्चना पवार, अमित ज्यु. कॉलेजचे प्राचार्य मिलींद रामटेके व रुखमा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आशा गुप्ता यांनी सहकार्य केले.