पशुपालनासाठी पालकांना मिळणार ५० टक्के अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:16+5:302021-06-20T04:20:16+5:30
महिन्यांत उर्वरित २५ टक्के थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये ३० टक्के महिला व ३ ...
महिन्यांत उर्वरित २५ टक्के थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये ३० टक्के महिला व ३ टक्के
दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थींकडे स्वत:च्या मालकीचा गोठा तथा जमीन जागा असणे
आवश्यक आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीने यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्यास लाभ घेतल्याचे दिनांकापासून ५ वर्षांच्या आत त्याच लाभार्थीस दुबार लाभ देण्यात येणार नाही. शेतकरी बांधवांनी पंचायत समितीमध्ये जाऊन सदर अर्ज नमुना प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरून
पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे २८ जूनपूर्वी जमा करावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीची निवड झाल्यानंतर निवड आदेश प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत गायीची खरेदी करणे आवश्यक राहील. योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अरविंद शंभरकर यांनी कळविले आहे.