मागण्या मान्य करण्यास भाग पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:40 PM2018-01-09T20:40:47+5:302018-01-09T20:41:09+5:30

शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे. शाळेत शिकविणारा शिक्षक समाधानी व आनंदी असेल, त्याला उत्तम स्थान मिळत असेल तर तो आनंदाने समाजाचा विकास घडवून आणतो. परंतु सद्यस्थितीत शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.

Participate the demands | मागण्या मान्य करण्यास भाग पाडा

मागण्या मान्य करण्यास भाग पाडा

Next
ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : सर्व मुख्याध्यापकांनी एकाच संघटनेत सहभागी व्हावे

आॅनलाईन लोकमत
खजरी : शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे. शाळेत शिकविणारा शिक्षक समाधानी व आनंदी असेल, त्याला उत्तम स्थान मिळत असेल तर तो आनंदाने समाजाचा विकास घडवून आणतो. परंतु सद्यस्थितीत शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे त्यांना समस्या सोडविण्यासाठी हेलपाटे खावे लागत आहे. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी संघटनेत सहभागी होवून मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.
येथील आदिवासी विविध विकास हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाद्वारे आयोजीत १७ व्या ‘जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या शैैक्षणिक संमेलन- २०१८’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शत्रुघ्न बिडकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून एन.एन. येळ व पाहुणे म्हणून मारोतराव खेडीकर, नरेंद्र वाळके, सतीश जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुनील मांढरे, अशोक पारधी, अनिल बाळसराफ, प्रफुल कचवे उपस्थित होते.
पुढे बोलताना परशुरामकर यांनी, प्रत्येक राज्याने अर्थसंकल्पात एकूण रकमेच्या ६ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करायची असते. परंतु राज्य सरकार केवळ ३ टक्के रक्कम खर्च करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर मात करण्यासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी एकाच संघटनेत सहभागी होऊन सरकारवर दबाव निर्माण करावा. त्याशिवाय मागण्या मान्य होणार नाही, असे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी मांडले. संघटनेच्या समस्यांचे विवरण यशवंत परशुरामकर यांनी मांडले. यामध्ये शासन व खात्याची मान्यताप्राप्त स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकसंच मान्यता देण्यात येते त्याचप्रमाणे स्वतंत्ररित्या शिक्षकेतर संघास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी दिलीप चाटोरे, खुशाल कटरे, यशवंत परशुरामकर, आर.एन. हेडाऊ, रामसागर धावडे, रजिया बेग यांच्यासह जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातील पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Participate the demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.