राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:51 AM2018-03-22T00:51:22+5:302018-03-22T00:51:22+5:30
राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा,
ऑनलाईन लोकमत
्नेगोंदिया : राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील दिव्यांग क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांना माहिती देताना येथे बोलत होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय आणि कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले, पशु, दुग्ध व मत्ससंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थित २४ मार्च रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल. तर २५ मार्च रोजी कार्यक्र माची सांगता होईल.
२३ मार्च रोजी दिव्यांग नियोजित स्थळी पोहचतील.
२३ ते २५ मार्चदरम्यान चालणाऱ्या तीन दिवशीय राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत सहभागी होणाºया दिव्यांगांसाठी सर्व सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. रेल्वेने येणाºयांसाठी गोंदिया रेल्वे स्टेशनातून तर एसटी बसने येणाºयांसाठी गोंदिया एसटी डेपोतून देवरी येथे पोहोचण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेच्या देवरी या ठिकाणी दिव्यांग क्रीडापटू तसेच त्यांच्यासोबत येणाºया सहकाºयांसाठी निवासाची, भोजनाची तसेच इतर सहाय्यकारी साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे बडोले यांनी सांगितले.
जिल्हास्तरातून प्रथम प्राविण्य मिळवलेले अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर, मतिमंद तसेच बहुविकलांग खेळाडू गोळाफेक, उंचउडी, लांबउडी, वेट लिफ्टींग, जलतरण, धावणे, अॅथलेटिक्स, बुध्दीबळ, व्हिलचेअर अशा २६ प्रकारच्या क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. राज्यभरातून सुमारे तीन हजार दिव्यांग खेळाडू या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतील. क्रीडा स्पर्धांसोबतच दिव्यांगत्वाचे त्वरित निदान होण्यासाठी शीघ्र हस्तक्षेप उपचार पध्दती, वाचा उपचार, भौतिक उपचार, निसर्गोपचार, संगीत उपचार तसेच व्यवसाय उपचार पध्दतीचे प्रशिक्षणही या वेळी दिले जाईल, असेही बडोले यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. मात्र यावर्षी प्रथमच देवरीसारख्या नक्षलग्रस्त दुर्गम भागात क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. शहरातील क्र ीडा स्पर्धांची दखल सर्वच घेतात. मात्र अतिदुर्गम भागात अशा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शहरी आणि खेडी यातील स्नेहसंबंध वृध्दींगत होतील असे वाटते. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे कळविले आहे.