अपूर्व विज्ञान मेळाव्यात १५० शाळांचा सहभाग
By admin | Published: February 15, 2016 02:03 AM2016-02-15T02:03:11+5:302016-02-15T02:03:11+5:30
पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा आमगाव खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेत घेण्यात आला.
सालेकसा : पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय अपूर्व विज्ञान मेळावा आमगाव खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेत घेण्यात आला. या मेळाव्यात १५० पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता.
उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, प्राचार्य व्ही.डी. मेश्राम, पंचायात समिती सदस्य जया डोये, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिमराव भास्कर, उपाध्यक्ष रत्नकला चकोले, अभियंता बी.के. ठाकरे उपस्थित होते.
मेळाव्यात प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या कला कौशल्यावर आधारित विज्ञान प्रतिकृती सादर केली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बाल वैज्ञानिकांना त्यांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे आवाहन केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी एस.जी. वाघमारे यांनी मांडत अपूर्ण मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. संचालन डी.बी. पटले यांनी यांनी केले. आभार विस्तार अधिकारी धुवाधपाडे यांनी मानले.
मेळाव्यासाठी सर्व केंद्रातील केंद्र प्रमुखासह मुख्याध्यापिका श्रृती चॅटर्जी, ए.एम. बघेल, आर.एस. चौधरी, ए.एस. फटे, मुख्याध्यापक एन. डी. पिंगळे, ग्रंथडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)