वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग आवश्यक

By admin | Published: June 17, 2016 02:11 AM2016-06-17T02:11:35+5:302016-06-17T02:11:35+5:30

दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व बिगडत चाललेले पर्यावरणाचे संतुलन यावर आळा घालण्यासाठी १ जुलै रोजी

Participation in the tree planting campaign is necessary | वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग आवश्यक

वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग आवश्यक

Next

परिविक्षाधीन डीएफओ पाटील : वनांच्या रक्षणात गावांचे हित, दोन कोटी वृक्ष लागवड
बोंडगावदेवी : दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व बिगडत चाललेले पर्यावरणाचे संतुलन यावर आळा घालण्यासाठी १ जुलै रोजी राज्यात सर्वत्र दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वृक्ष लागवड कार्यक्रम एक प्रभावी लोकचळवळ व्हावी यासाठी या उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग अती आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यानेच वृक्षांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन करता येईल. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात गावातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन परीविक्षाधिन जिल्हा उपवनसंरक्षक तथा अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल पाटील यांनी केले.
दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या जनजागृती दरम्यान येथील क्षेत्रसहाय्यक कार्यालयात आयोजित संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या विचार मंथन बैठकीदरम्यान ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी परीविक्षाधिन जिल्हा उपवनसंरक्षक तथा वन परिक्षेत्राधिकारी राहुल पाटील होते. मार्गदर्शक म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, क्षेत्र सहाय्यक एम.एम. धुर्वे होते. याप्रसंगी स्थानिक सरपंच राधेशाम झोळे, निमगावचे सरपंच देवाजी डोंगरे, खांबीच्या सरपंच शारदा खोटेले, प्रधान वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमरचंद ठवरे, भाष्कर कवरे, चोपराम शिवणकर, योगिराज ढवळे, अशोक लंजे, सेवानिवृत्त वनाधिकारी यशवंत लंजे, बाळबुद्धे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राहुल पाटील म्हणाले, गावाजवळच्या जंगलाची वनविभागाची जबाबदारी असली तरी गावाच्या हितासाठी सामान्य जनतेने वृक्षांची जोपासना करण्यासाठी, आपले एक कर्तव्य समजून प्रत्येकाने पुढे येवून वनविभागाला सहकार्य करावे. वृक्षतोडीने पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. वातावरणात बदल, अनियमित पर्जन्यमान अशी जाणीव निसर्ग आपल्याला करुन देत आहे. वृक्ष संगोपन करुन जंगलवाढ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गावकऱ्यांना वनापासून बरेच फायदे आहेत. ग्रामस्थांनी स्वत:चे गाव ‘वनग्राम’ घोषित करुन प्रस्ताव वनविभागाकडे पाठवावे. यामुळे गावाचा विकास होण्यात हातभार लागेल, असे पाटील यांनी सांगितले. १ जुलै रोजी येथील रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये गावातील जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. लोकसहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. यामध्ये शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन सुनील पाटील यांंनी केले.
याप्रसंगी वनक्षेत्राधिकारी रहांगडाले, क्षेत्र सहाय्यक धुर्वे यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार देवेंद्र उईके यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Participation in the tree planting campaign is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.