रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवाशांनी व्यक्त केला संताप; गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 09:17 PM2023-01-04T21:17:00+5:302023-01-04T21:17:32+5:30

Gondia News रेल्वे विभागाच्या मालगाड्या फस्टच्या धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी बुधवारी गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा संताप व्यक्त केला.

Passengers expressed their anger by getting down on the railway tracks; Tense atmosphere at Gondia railway station | रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवाशांनी व्यक्त केला संताप; गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण 

रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवाशांनी व्यक्त केला संताप; गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण 

googlenewsNext

गोंदिया : मागील तीन-चार महिन्यांपासून प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले असून त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या मालगाड्या फस्टच्या धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रकाराने संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी बुधवारी (दि.४) सायंकाळच्या ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा संताप व्यक्त केला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील सर्वच प्रवासी गाड्या विलंबाने धावत आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासाठी तब्बल सहा तास लागत असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पाेहोचण्यास विलंब होत आहे. अनेकांना नागपूर रेल्वे स्थानकावरून पोहचून तेथून पुढची गाडी पकडून पुढे जाणे शक्य होत नाही. तर दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा याची झळ बसत आहे. हा प्रकार सातत्याने सुरू असून यासंदर्भात रेल्वे विभागाला निवेदन देऊन सुद्धा यात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळच्या सुमारास शालीमार ओखा ही गाडी थांबवून मालगाडी सोडण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली तर काहींनी मालगाडी दगडफेक केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी शांत झाले.

मालगाड्या फस्टचे धोरण बदला

रेल्वे विभागाने मालगाड्या फस्टचे धोरण अवलंबिले असून यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. याची झळ प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने हे धोरण त्वरित बदलविण्याची मागणी प्रवाशांनी यावेळी रेल्वे विभागाकडे केली.

.........................

Web Title: Passengers expressed their anger by getting down on the railway tracks; Tense atmosphere at Gondia railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे