प्रवाशांची गळक्या बसेसपासून होणार सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:39+5:302021-08-22T04:31:39+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसेस आगारातच उभ्या होत्या. अशात कित्येक बसेसमध्ये मेंटेनन्सची ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन लागल्यामुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसेस आगारातच उभ्या होत्या. अशात कित्येक बसेसमध्ये मेंटेनन्सची कामे निघाली व कित्येकांना गळकीही लागली आहे. अशात प्रवाशांना मात्र गळक्या बसेसमधून प्रवास करावा लागत असून यामुळेच त्यांनी प्रवास त्रासदायक होतो. मात्र प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी प्रयत्नरत असलेल्या महामंडळाने गळक्या बसेसची त्वरीत दुरूस्ती करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, गोंदिया आगाराकडे असलेल्या २ गळक्या बसेसची दुरूस्ती करण्यात आली असून आतापर्यंत तरी तक्रार आली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळ बसेसच्या दुरूस्तीसाठी उपयोगी पडला.
------------------------------
विभागीय कार्यालयाकडे मेंटेनन्स
आगारातील बसेसचे मेंटेनन्स करण्यासाठी आगारातच वेगळा विभाग आहे. शिवाय, विभागीय कार्यालयाकडून सर्व साहित्य व गाड्यांचे पार्ट्स पाठविले जात असल्याने गाड्यांमध्ये कधीही काही नादुरूस्ती आल्यास लगेच त्यांची दुरूस्ती केली जाते. आगारातच मेकॅनिक्स असल्याने त्यांच्याकडे फक्त बसेसच्या मेंटेनन्सचे काम आहे. यामुळे आगारांना बाहेर मेंटेनन्ससाठी पैसा खर्च करावा लागत नाही.
-------------------------
पूर्वी एसटीचा प्रवास म्हणताच धडकी भरत होती. मात्र आता एसटीने कात टाकली असून गळक्या बसेस व फाटक्या सीटांपासून सुटका झाली आहे. आता फक्त रस्त्यांमुळेच एसटीच्या प्रवासात दचके खावे लागत आहेत.
- अविनाश मेंढे
------------------------
आताच्या एसटी पूर्वी सारख्या राहिलेल्या नाहीत. पूर्वी पाणी गळत असतानाही व फाटक्या सीटवर बसून जावे लागत होते. आता मात्र तशा एसटी दिसत नाही. महामंडळाने एसटीचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असून प्रवाशांची सोय केली आहे.
- राजू शिवणकर
------------------------
कोट
आता एसटीने कात टाकली असून प्रवाशांच्या सोयीनुसार बदल केले जात आहेत. आगाराकडे गळक्या २ बसेस होत्या व त्यांची लगेच दुरूस्ती करण्यात आली आहे. आता त्याबाबत काहीच तक्रारी नसून लॉकडाऊनचा काळ बसेसच्या दुरूस्तीसाठी कामीच आला.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.