बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:11 AM2017-12-03T00:11:47+5:302017-12-03T00:12:03+5:30

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच....

The patient's death by putting off the oxygen mask | बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू

बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार : अधिष्ठातांचा दोन तास घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांचा घेरावा घालून संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
धर्मश्याम चंद्रसेन पटले (४८) रा. नवरगाव असे बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने मृत्यु झालेल्या रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पटले यांना खोकल्याच्या त्रास असल्याने शनिवारी (दि.२) दुपारच्या सुमारास त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयुच्या बेड क्रमांक दोन दाखल करण्यासाठी डॉ. मोनल अग्रवाल यांनी पाठविले. मात्र त्या क्रमांकाचा बेड खाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना जनरल वार्डात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना आक्सिजन मॉस्क लावण्यात आले. मात्र त्यात आक्सिजन नसल्याने रुग्ण जोरोने श्वास घेवू लागला. रुग्णांच्या नातेवाईकांनी याची माहिती उपस्थित वैद्यकीय अधिकाºयांना दिली. मात्र त्यांनी वेळीच उपचार करणाºयाकडे दुर्लक्ष केल्याने पटले यांचा मृत्यु झाला. दरम्यान या घटनेची माहिती पटले यांच्या नातेवाईकांनी काँग्रेस नेता अमर वराडे, आलोक मोहंती, अ‍ॅड.योगेश अग्रवाल, जि.प.सदस्य शेखर पटले यांना दिली. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात पोहचत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रुखमोडे यांचा घेराव घालून याचा जाब विचारला. तसेच हलगर्जीपणा करणाºया डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. वराडे यांनी प्रा. विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, विभाग प्रमुख डॉ.संजय येडे, प्रोफेसर डॉ.राजेंद्र वैद्य यांना निलंबित करण्याची व त्यांचे लायन्स रद्द करण्याची मागणी केली. वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना गोंदिया येथे बोलविण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतकाचा मृत देह न उचलण्याची भूमिका घेतली होती.
रजा न घेताच विभाग प्रमुख गायब
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रुखमोडे यांनी प्राध्यापक विभागप्रमुख डॉ.येडे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून तुम्ही कुठे आहात अशी विचारणा करित वैद्यकीय महाविद्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी आपण कान्हा केसली येथे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे डॉ.येडे हे सुट्टीचा अर्ज न देताच सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The patient's death by putting off the oxygen mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.