पवनीत १२२ जणांचे महारक्तदान

By admin | Published: September 8, 2016 12:30 AM2016-09-08T00:30:42+5:302016-09-08T00:30:42+5:30

जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लष्करातील जवानांसाठी ५० हजार रक्तबाटल्या

Pawan to 122 people's superintendence | पवनीत १२२ जणांचे महारक्तदान

पवनीत १२२ जणांचे महारक्तदान

Next

नवेगावबांध : जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लष्करातील जवानांसाठी ५० हजार रक्तबाटल्या व महाराष्ट्र सरकारला ५० हजार रक्तबाटल्या असे एकूण एक लाख बाटल्या दान करण्याचा महासंकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री संप्रदाय तालुका अर्जुनी मोरगावच्या वतीने ३ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे येथे १२२ रक्त बाटल्या संकलित करण्यात आल्या.
रक्तदान शिबिरादरम्यान श्री संप्रदायाचे अनुयायी, ए.ओ.पी. पवनी-धाबे.चे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी-धाबे.चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, आश्रम शाळा, जि.प. शाळा व महाविद्यालय तसेच परिसरातील युवावर्ग अशा १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उद्घाटन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य मंदा कुंभरे, पं.स. सदस्य पे्रेमलाल गेडाम, सरपंच केसराम छीकुंवर, डॉ. हजारे, डॉ. मेंढे, पीएसआय पाटील, नाजूक कुंभरे, नरेश बुडगेवार, विश्वेसर कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवक कल्याण डोंबविलेचे दशरथ घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ता शैलेश जायस्वाल यांनी भेट दिली व कौतुक केले. कार्यक्रमासाठी सर्व सेवा केंद्राचे अध्यक्ष, तालुका, जिल्हा कमिटीचे अधिकारी तसेच मंजुषा तरोणे, जयपाल खांडवाये, पुरुषोत्तम वल्के, रमेश मस्के, भेंडारकर, पटे, रामकृष्ण भोयर, रमेश बाकरे यांनी सहकार्य केले. संंचालन महेंद्र रहिले यांनी केले. आभार गावड यांनी मानले.

Web Title: Pawan to 122 people's superintendence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.