बीएलओचे दोन वर्षांचे थकीत मानधन द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:38+5:302021-09-26T04:31:38+5:30
गोंदिया : मागील दोन वर्षांपासून थकून असलेले बीएलओंचे मानधन त्वरित देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मागणी बीएलओ संघटनेच्या ...
गोंदिया : मागील दोन वर्षांपासून थकून असलेले बीएलओंचे मानधन त्वरित देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मागणी बीएलओ संघटनेच्या वतीने तहसीलदारांना शुक्रवारी (दि. २४) निवेदन देण्यात आले.
येथील उपविभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. २४) निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमअंतर्गत बीएलओ व पर्यवेक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला तहसीलदार आदेश डफळ, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पलांदूरकर व अप्पर तहसीलदार खडतकर उपस्थित होते. बैठकीत मतदार यादीचे कार्य अगदी सोयीस्कर व उत्कृष्ट व्हावे, या उद्देशातून नवीन ‘गरुड’ ॲपच्या माध्यमातून कार्य करण्याबाबत तसेच नवीन मतदार नोंदणी व अन्य कार्यांबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, बीएलओंनी आपापल्या क्षेत्रात निर्माण होत असलेल्या समस्या बैठकीत मांडल्या. तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण कोचे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष माधुरी खोब्रागडे आणि संघटक दिनेश पटले व अन्य बीएलओंच्या उपस्थितीत दोन वर्षांपासून थकीत असलेले मानधन लवकरात लवकर देण्यात यावे, मानधनात वाढ करून वार्षिक २० हजार रुपये करण्यात यावे. कार्य करण्याकरिता बॅग व स्टेशनरी खर्च देण्यात यावा, बैठकांचा भत्ता देण्यात यावा, मतदार यादी आधार कार्ड नंबरने जोडण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.