सन्माननीय पगारवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:24+5:30

युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका अनेक ग्राहकांना सुध्दा बसला.

Pay honorable salary | सन्माननीय पगारवाढ द्या

सन्माननीय पगारवाढ द्या

Next
ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांची मागणी : शुक्रवार व शनिवारी कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन्माननीय पगारवाढ द्या यासह अन्य मागण्यांना घेऊन युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकरण्यात आले आहे. यांतर्गत, शुक्रवारी (दि.३१) बँक कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँकसमोर नारेबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनांतर्गत आता शनिवारी (दि.१) शासकीय बँकांत कामबंद राहणार आहे.
सन्माननीय पगारवाढ द्या, ५ दिवसांचा आठवडा, स्पेशल अलाऊंस मुळ पगारात समाविष्ट करावा, नवीन पेंशन योजना रद्द करावी, महागाई भत्ता मुळ पेंशनमध्ये समाविष्ट करून पेंशनची पुनर्रचना करावी, फॅमिली पेंशनमध्ये पुरेशी वाढ करावी, कार्यरत नफ्याशी निगडीत कर्मचारी कल्याण योजना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभावर आयकर लागू करू नये, कामकाजाची वेळ व मध्यंतर यात सुसूत्रता आणावी,लिव्ह बँक योजना लागू करावी, अधिकारी वर्गाचे कामाचे तास निधार्रित करावे, कंत्राटी कर्मचारी तसेच बिझनेस करस्पॉंडंट यांना नियमित कर्मचारी एवढाच पगार द्यावा आदी मागण्यासाठी युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यांतर्गत, शुक्रवारी (दि.३१) कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँक समोर नारेबाजी करून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला.
या आंदोलनांतर्गत शनिवारीही (दि.१) शासकीय बॅँकांत कामबंद आंदोलन राहणार आहे. या आंदोलनामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच फजीती झाल्याचे दिसले.

कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प
युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका अनेक ग्राहकांना सुध्दा बसला.
असा आहे आंदोलनाचा टप्पा
युनियनच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत सध्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर ११, १२ व १३ मार्च रोजी कामबंद आंदोलन केले जाईल. यावरही मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

Web Title: Pay honorable salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.