सरसकट कर्ज माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:59 AM2017-06-25T00:59:51+5:302017-06-25T00:59:51+5:30

३० जून २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज कोणतीही अट न ठेवता सरसकट माफ करण्यात यावे,

Pay off most debt | सरसकट कर्ज माफी द्या

सरसकट कर्ज माफी द्या

Next

शेतकऱ्यांची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : ३० जून २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज कोणतीही अट न ठेवता सरसकट माफ करण्यात यावे, कोणतीही जबरदस्ती न करता पीकविमा ऐच्छिक करण्यात यावा, डॉ.एम.एस.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या या मागण्यांसाठी सेवा सहकारी संस्था, बँक प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय रामटेके यांच्यामार्फत महसूल, कृषी, सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाध्यक्ष उपाध्यक्ष बँक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची सभा बी.जी.पटले कनिष्ठ विद्यालयात मुंडीकोटा संस्थेचे अध्यक्ष गोपीचंद भेलावे यांच्या अध्यक्षतेत खोपडाचे अध्यक्ष नत्थु बावणकर, खडकीचे अध्यक्ष डॉ. शिशुपाल पटले, इंदोराचे अध्यक्ष हेमराज अंबुले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. सर्वात प्रथम आंदोलनात व आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे काही अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून आलेले तेजराम चव्हाण, श्रावण रहांगडाले, भुमेश्वर रहांगडाले, ओमप्रकाश पटले, दिपक पटले, दिनेश चोभरे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.सभेत कर्जमाफीवर अनेक प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले. चर्चेत सरसकट कर्जमाफी व अन्य मागण्यांना घेऊन तहसीलदारांमार्फत कृषी व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना बळीराम धुर्वे, राधेश्याम नागपूरे, मनराज सोनवाने, इंदल बिसेन, केशरचंद पारधी, मनोज बिसेन, बाबुलाल चौधरी, यशवंत रहांगडाले उपस्थित होते. सभेत किशोर रहांगडाले, सतपाल पारधी, राजेश ग्यानचंदानी, देवचंद रिनाईत, हरिकीशन कडव, छबीलाल टेंभरे, मधुकर तिडके, हंसराज रहांगडाले, डॉ. संजय भांडारकर, उत्तम कुकडे, रंगलाल अंबुले, मारोती पटले, यशवंत पटले, श्यामा ठाकुर,यशवंत कांबळी, टिकाराम चौधरी, चुन्नीलाल पटले, श्यामराव पटले, कंठीलाल ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Pay off most debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.