दंड भरू; पण बाहेर फिरू, विनाकारण बाहेर फिरणारे ११० जण आले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:33+5:302021-05-22T04:27:33+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अतंर्गत कडक निर्बंध लागू केले. कोरोना ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अतंर्गत कडक निर्बंध लागू केले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. या प्रकाराला प्रतिबंध लावण्यासाठी देवरी नगर परिषद, महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे माेहीम राबवून विनाकारण शहरात बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. जवळपास महिनाभर चालविलेल्या या मोहिमेदरम्यान चाचणी केली असता ११० जण पॉझिटिव्ह आले. या सर्वांची रवानगी कोरोना केअर सेंटरमध्ये करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ‘दंड भरू, पण बाहेर फिरू’ अशीच मानसिकता काही नागरिकांमध्ये अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे आहे. गोंदिया शहर पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ३५५ जणांवर कारवाई करून धडा शिकविण्याचा प्रयत्न केला.
.......
शहरात बारा ठिकाणी कारवाई
गोंदिया शहरातील मुख्य मार्ग आणि चौकात लॉकडाऊनदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे, तसेच शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना अडवून त्यांची चौकशी केली जात आहे, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर पोलिसांनी मागील आठवडाभरात ३५५ जणांवर कारवाई केली, तर १५ ते २० जणांची कोरोना चाचणी करून त्यांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे.
......
साहेब औषधी, भाजीपाला आणायला चाललो...
- विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची चौकशी करतात तेव्हा बहुतेक तरुण हे, साहेब आईसाठी औषध आणायला चाललो असे सांगतात तर काही जण भाजीपाला आणि किराणा आणायला चाललो अशी कारणे देतात. भाजीपाला आणि किराणा आणायला हीच कारणे सर्वाधिक देत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
- माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे म्हणून मित्राला घेऊन पेट्रोल घेण्यासाठी चाललो असे कारणे काही विनाकारण फिरणारे देतात.
- काही जण नातेवाईक रुग्णालयात सिरियस आहे त्याला बघायला चाललो, औषधी नेऊन द्यायची आहेत अशी खोटी कारणे सुद्धा देतात. यामुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागतो.
......
कोरोनाचे एकूण रुग्ण :
एकूण कोरोनामुक्त झालेले रुग्ण :
सध्या पॉझिटिव्ह असलेले रुग्ण :
किती रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी करण्यात आली : ८३२
किती जण पॉझिटिव्ह आले : ११०