बोनसची उर्वरित रक्कम त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:21 AM2021-07-16T04:21:04+5:302021-07-16T04:21:04+5:30
सालेकसा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु शेवटी बोनसची अर्धिच ...
सालेकसा : शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याचे जाहीर केले. परंतु शेवटी बोनसची अर्धिच रक्कम दिली आहे. तरी शासनाने घोषणेप्रमाणे ७०० रुपये प्रमाणे पूर्ण बोनस शेतकऱ्यांना देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणी करणारे पत्र सालेकसा तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
तहसीलदार सालेकसा मार्फत पाठविलेल्या पत्रात म्हटले की, एक तर धानावरील मिळणारी बोनसची रक्कम तीन महिन्यापूर्वी मिळणे गरजेची होती. तो त्यावेळी दिली नाही. शेतकऱ्यांच्या सतत मागणी वरुन राज्य शासनाने बोनसची रक्कम मंजूर केली परंतु ७०० ऐवजी ३५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणेच दिली हा शेतकऱ्यांसोबत मोठा विश्वास घात आहे. जर सरकारला आपल्या बोलण्यावर कायम राहायचे असेल पूर्ण ७०० रुपये प्रमाणे मंजूर करावे, अन्यथा जनतेचा विश्वास राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि जि.प. मार्फत मिळणारे शेती संबंधी औजारे व बि-बियाणे यांच्यावरील अनुदान सुद्धा बंद करण्यात आले आहे. कोविड काळात त्रस्त असलेला शेतकरी त्याला राज्य शासना पुन्हा जास्त अडचणीत आणण्याचे काम होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होण्याच्या वाटेवर आला आहे. अशात शेतकऱ्यांना तातडीने विविध प्रकारच्या साहित्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन भाजप तालुकाध्यक्ष गुणवंत बिसेन, बाबा लिल्हारे, राजू येटरे, आर.डी.रहांगडाले आदिंनी हंगामी तहसीलदार अरुण भुरे यांना दिले.