राजेश्वर किरसानचा खून करणाऱ्यांना १० जुलैपर्यंत पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:04+5:302021-07-10T04:21:04+5:30
गोंदिया : तालुक्याच्या लोहारा येथील राजेश्वर ऊर्फ राजू डोमा किरसान (वय ३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी ...
गोंदिया : तालुक्याच्या लोहारा येथील राजेश्वर ऊर्फ राजू डोमा किरसान (वय ३६) याला मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात २३ जून रोजी दुपारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याला बेशुद्धावस्थेत गाडीत टाकून नेले. त्याचा मृतदेह ६ जुलै रोजी बोपाबोडी येथील जंगलात पुरलेल्या अवस्थेत आढळला. या संदर्भात दवनीवाडा पोलिसांनी या प्रकरणात ११ जणांवर खुनाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृतकची पत्नी सेवागन किरसान (३०) यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसात भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४४ सहकलम ३१ (१) सहकलम ३ (२) व्ही.ए. २०१५ (३) (२) (५) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींत ग्यानिराम ऊर्फ बंडू बैतराम किरनापुरे (वय ५०), कोमल ग्यानिराम किरनापुरे (२६), चंद्रीप्रकाश प्रेमलाल लिल्हारे (३५), विनोद ग्यानिराम किरणापुरे (२४), राहुल झनकलाल कटनकार (१९), गोपीचंद लोकचंद कटनकार (२१), कीमल योगराज नागपुरे (२८) , ओमप्रकाश उर्फ दिनेश यादोराव नागपुरे (४५) गीता ग्यािराम किरणापुरे (४५), निशिगंधा कोमल नागपुरे (२५) व भगवंतीबाई खेमलाल नागपुरे (३५) सर्व रा. लोहारा यांचा समावेश आहे.