नियम तोडणाऱ्या ५६२ वाहन चालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:25 PM2019-04-26T20:25:31+5:302019-04-26T20:26:07+5:30
जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. एक लाख ४७ हजार ७०० रूपयांचा दंड एकाच दिवसात दुचाकी वाहनचालकांच्या खिशातून वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मरण पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. त्यामुळे जखमी व्यक्ती अवकाळी मरण पावतात. वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे पोलिसांना यापूर्वी दंड करण्यात आला होता. सामान्य नागरिकांनीही वाहन चालवितांना हेल्मेट वापरावेत म्हणून त्यांच्यासाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली.
त्यानुसार, शुक्रवारी (दि.२६) हेल्मेट न लावता वाहन चालविणाºया वाहनचालकांना दंड ठोठवण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.यात, हेल्मेट न वापरणाºया ११७ वाहनचालकांना ५०० रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला. ८० जणांना ट्रीपल सीटसाठी तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेल्या १९ वाहनांना यासह शहरातील चार पॉर्इंटवर २०४ प्रकरणातून दंड वसूल करण्यात आला.