उघड्यावर शौचाला बसणाऱ्यास दंड
By Admin | Published: February 14, 2017 12:55 AM2017-02-14T00:55:12+5:302017-02-14T00:55:12+5:30
शहरातील जनतेने नवीन घर बांधणे, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स लावणे, घरी नवीन बोअरवेल खोदणे, ...
मुख्याधिकाऱ्यांचे फर्मान : कोणत्याही कामास पूर्वपरवानगी आवश्यक
देवरी : शहरातील जनतेने नवीन घर बांधणे, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स लावणे, घरी नवीन बोअरवेल खोदणे, सार्वजनिक कार्यक्रमात रॅली काढणे इत्यादी सर्व बाबींकरिता नगर पंचायतीची पूर्वपरवानगी व नाहरकत घेणे अती आवश्यक आहे. अन्यथा अवैधरीत्या केलेल्या कोणत्याही कामावर कडक कारवाई करण्यात येईल, असे फर्मान नगर पंचायत मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकातून काढले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, १५ फेब्रुवारीपूर्वी नगर पंचायतकडून अनुदान प्राप्त वैयक्तिक शौचालय लाभार्थ्यांनी आपले शौचालय बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा १५ फेब्रुवारीनंतर नगर पंचायतच्या गुड मॉर्र्निग पथकाद्वारे उघड्यावर शौचालयाला बसणाऱ्या जागेची कडक तपासणी करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरूध्द ५०० रु. दंड आकारण्यात येईल. तसेच शहर पूर्ण कॅशलेस करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरात धडक मोहीम सुरू आहे. तरी नगरपंचायतच्या स्वयंसेवकांना दुकानदार व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करून त्यांच्याकडून कॅशलेस व्यवहार कसे करावे हे परिपूर्ण समजून घ्यावे.
त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी शहरात नवीन घर बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स नवीन बोर खोदणे आणि सार्वजनिक कार्यक्रमात रॅली काढणे आदि कामासाठी नगरपंचायतची पूर्व परवानगी व नाहरकत घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरात केलेले कोणतेही काम हे अवैधरित्या आहे, असे समजून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकातून कळविले आहे. (प्रतिनिधी)