लोकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:32+5:302021-03-25T04:27:32+5:30
सालेकसा : सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक आरोग्यात मोफत कोरोना लस लावण्यात येत असून, या मोफत लसीकरणाचा लाभ प्रत्येकाने ...
सालेकसा : सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक आरोग्यात मोफत कोरोना लस लावण्यात येत असून, या मोफत लसीकरणाचा लाभ प्रत्येकाने घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे, असे प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू रघटाटे यांनी कळविले आहे.
डॉ. राजू रघटाटे म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येेथे ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना सोमवार ते शनिवार सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लस टोचण्याची सोय उपलब्ध आहे. ही लस दररोज शंभर लोकांसाठी उपलब्ध असून, सध्या दररोज ५० ते ६० व त्यापेक्षा जास्त लोक लसीकरणाचा लाभ घेत आहेत. लसीकरण मोहिमेत ४५ वर्ष वयापेक्षा जास्त असे लोक ज्यांना उच्च रक्तचाप, मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत, अशा नागरिकांनीसुद्धा स्वत:ला लस लावून घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येताना प्रत्येकाने सोबत आपले आधारकार्ड घेऊन यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विरुद्ध लस देण्याचे काम डॉ. राजू रघटाटे यांच्या मार्गदर्शनात सुरळीत सुरू आहे. यासाठी डॉ. अफसर अली, एल.डी.भुसारे, मोहन गिरी, मंगला रहांगडाले, एस.एम.पारधी, पी.एस.कटरे व इतर आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आरोग्य केंद्रात भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस देण्यात येत असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना न घाबरता लस लावून घ्यावी, असे कळविले आहे.