जनता धडा शिकविणार
By admin | Published: February 22, 2016 01:58 AM2016-02-22T01:58:47+5:302016-02-22T01:58:47+5:30
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते.
हेमंत पटले : देशद्रोही व त्यांच्या समर्थकांची गय नाही, हस्ताक्षर अभियान
गोंदिया : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसांपूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवाद समर्थित आंदोलन केले होते. त्यांच्या या कृत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेस, साम्यवादी व त्यांच्या मित्रपक्षांनी समर्थन केले होते. हे अविवेकी व राजकीय दिवाळखोरीचे लक्षण असून आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करतो, याचे त्यांना भान नाही. दहशतवाद्यांचे समर्थन व देशाविरोधात बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
भारतीय जनता पक्षाद्वारे देशव्यापी जन स्वाभिमान अभियानांतर्गत शनिवारी आंबेडकर चौकात धरणे आंदोलन व हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, त्यांचे चेहरे आता समोर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर अग्रेसर असून देशाच्या देशाच्या एकता, अखंडतेला तडा देण्याचे कार्य काही राजकीय शक्तीद्वारे केले जात आहे. त्यामुळे जनतेच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकविणार, असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, माजी आ.डॉ. खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश्वर रहांगडाले, माजी आ. हरिश मोरे, विनोद अग्रवाल, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस सीता रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. सभापती छाया दसरे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, नंदकुमार बिसेन उपस्थित होते.
धरणे आंदोलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता करण्यात आली. सर्वप्रथम भारत माता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी जेएनयू घटनेच्या निषेधार्थ हस्ताक्षर अभियानाला शेकडो लोकांनी हस्ताक्षर केले.
आंदोलनादरम्यान आ. विजय रहांगडाले यांनी जनतेला संबोधित करताना, ज्या ताटात खातात त्याच ताटाच छिद्र करणाऱ्या गद्दारांना हा देश कधीही माफ करणार नाही. तर डॉ. बोपचे यांनी, जेएनयूमध्ये देशविरोधी कारवायांचा क्रम अनेकदा उघडकीस आला आहे. मात्र आता जे कृत्य त्यांनी केले आहे, याचे उत्तर या देशाची देशभक्त जनता देणार असून या देशद्रोहींना कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या समर्थकांचा धिक्कार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, खोमेश रहांगडाले, हरिश मोरे, विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, सीता रहांगडाले, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रीय, छाया दसरे, महेश आहुजा, धनंजय तुरकर, बार असोसिएशनचे पराग तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.
आंदोलनादरम्यान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंडपाला भेट देवून हस्ताक्षर मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. तसेच भारत माता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. कटरे व अनेक संघटनांच्या वतीने जन स्वाभिमान अभियानाला समर्थ देत मंडपाला भेट दिली. संचालन जयंत शुक्ला यांनी केले.
या वेळी भाऊराव उके, गणेश हेमणे, भाऊदास कठाणे, लिखेंद्र बिसेन, श्यामलाल ठाकरे, उमाकांत ढेंगे, प्रदिपसिंह ठाकूर, मुनाफ कुरेशी, किशोर हालानी, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने, विश्वजित डोंगरे, कमलेश्वर लिल्हारे, श्यामकला पाचे, नगरसेवक शिव शर्मा, राहुल यादव, मैथुला बिसेन, श्रद्धा अग्रवाल, घनश्याम पानतवने, संजय मुरकुटे, सोमाजी गणवीर, राजेश चतुर, हरिप्रसाद चिखलोंढे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)