लोकांच्या विश्वासाची हत्या झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:37 AM2018-05-27T00:37:42+5:302018-05-27T00:37:42+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
येथील गणेशनगर येथील मैदानावर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, डॉ.खुशाल बोपचे, भाजचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ. भेरसिंग नागपुरे, केशव मानकर, हेमंत पटले, माजी आ. रमेश कुथे, राजकुमार कुथे व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, आमच्या सरकाराने स्वच्छ भारत अभियान सुरू केले. काँग्रसने ६७ वर्षात ५० लाख कुटुंबासाठी शौचालय देशात बांधले. परंतु आमच्या सरकारने ३ वर्षात ६० लाख कुटुंबांसाठी शौचालये बांधली. देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ वर्षे पूर्ण होताच या देशातील गरीबातील गरीबाचे घर असेल. २ वर्षात ४ लाख घरे एकट्या महारष्ट्रात दिले. अजून ग्रामीण भागात ८ लाख घरे देणार आहोत. गोंदिया जिल्ह्यातील ९० हजार कुटुंबांना घरे देणार आहोत. शहरातील फुटपाथवरील लोकांना पट्टे देत आहे. नझुलच्या जागेलाही पट्टा दिला. निर्वासित सिंधी समाजाला पट्टे दिले. गोंदिया नगर परिषदेला २ वर्षात ५२ कोटी रूपये दिले आहेत. रोजगार देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील सहा महिन्यात देशातील ३० लाख लोकांना रोजगार देता आले. त्यातील ८ लाख रोजगार महाराष्टष्ट्रात देण्यात आले आहे. महाराष्ट्र रोजगार देण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मागील चार वर्षापासून शेतकऱ्यांना २०० रूपये बोनस देत आहे. शिक्षण, आरोग्याच्या सेवेसाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात विरोधकांवर टिका केली. संचालन व आभार दीपक कदम यांनी मानले.