महावितरणच्या कारभारात लोकसहभाग
By admin | Published: April 10, 2015 01:32 AM2015-04-10T01:32:27+5:302015-04-10T01:32:27+5:30
महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी ...
गोंदिया : महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यासाठी गोंदियात महावितरणकडून तयारी सुरू झाली आहे.
जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना जिल्हाधिकारी तर तालुकास्तरीय समितीची स्थापना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील नियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तर महावितरणच्या परिमंडळाचे मुख्य अभियंता हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत. जिल्हास्तरीय समितीतील शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या सहमतीने जिल्हाधिकारी व महावितरणचे मुख्य अभियंता करणार असून एका महिन्याच्या आत या समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीने सूचविलेल्या सूचना किंवा मार्गदर्शन शासनस्तरावर पाठविण्यात येवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)