निष्ठापूर्वक कर्तव्य पार पाडणे म्हणजेच देशभक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:03 AM2019-01-31T01:03:41+5:302019-01-31T01:05:43+5:30
सीमेवर जाऊन देशासाठी लढणे यालाच लोक देशभक्ती म्हणतात. परंतु आपल्या वाट्याला आलेले कोणतेही कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडले तर ती सुद्धा एक मोठी देशभक्ती आहे. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सीमेवर जाऊन देशासाठी लढणे यालाच लोक देशभक्ती म्हणतात. परंतु आपल्या वाट्याला आलेले कोणतेही कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडले तर ती सुद्धा एक मोठी देशभक्ती आहे. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे यांनी केले.
तालुक्यातील झालीया येथे गवराबाई हायस्कूल, नारायणभाऊ हायस्कुल लोहारा आणि कचारगड आदिवासी आश्रम शाळा पिपरीया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२७) आयोजित रजत पदक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रखर गांधीवादी नेते माजी आ.स्व. नारायण बहेकार यांच्या समृतिप्रीत्यर्थ प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रजत पदकाने यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन व पदक वितरण आ. हिना कावरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे हे होते. याप्रसंगी शाळेच्या चार दिवसीय स्रेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्रेहसंमेलनाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त कृषी अधिकारी पी.डी.शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, लांजीचे माजी आमदार भागवत नागपुरे, किरणापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा पटेल, जि.प.महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य विजय टेकाम, लखन अग्रवाल, पुरुषोत्तम बनोठे, वासुदेव चुटे, जी.के.दसरिया, संस्थेचे अध्यक्ष सावलराम बहेकार, सचिव यादनलाल बनोठे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्व. नारायण बहेकार, गवराबाई बहेकार तसेच संस्थेचे दिवंगत उपाध्यक्ष राजेंद्र बहेकार व महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम प्रभारी दिलीप बनोठे यांनी मांडले. संस्थेचे सचिव यादनलाल बनोठे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संचालन नूतन दमाहे यांनी केले तर आभार प्राचार्य ए.के. ढेकवार यांनी मानले.
विद्यार्थ्यांना विधानसभेत येण्याचे आमंत्रण
मध्यप्रदेश विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे यांनी विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश विधानसभेत विधिमंडळाचे कामकाजाचे प्रत्यक्ष कसे चालते हे पाहण्यासाठी मध्यप्रदेशात येण्याचे आमंत्रण दिले.