पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:27 AM2018-04-30T00:27:02+5:302018-04-30T00:27:02+5:30
शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे.
गेल्या काही काळात शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाºयांना शिवीगाळ व मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी व पेट्रोलपंप चालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच टीबीटोली येथील बिसेन पेट्रोल पंपवर लूटमार व कर्मचाºयाला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ व पेट्रोल पंपावर सुरक्षा पुरवून अशा असामाजिक तत्वांना आळा घालण्यात यावा व आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने शहरातील सर्व पेट्रोलपंप बंद करण्याचा इशारा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, रामनगरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या वेळी गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण बोपचे, गोंदिया शिवसेना तालुका प्रमुख आदी उपस्थित होते.