तरुणाच्या आधारकार्डवर महिलेचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 09:49 PM2018-10-28T21:49:01+5:302018-10-28T21:49:51+5:30

यंत्रणेकडून झालेली चूक तरूणासाठी अभिशाप ठरत असून यामुळे संबंधित तरूण रोजगार व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचीत ठरत असल्याचा प्रकार तालुक्यातील ग्राम झांजिया येथे घडत आहे.

Photo of the woman on the basis of the Aadhar card | तरुणाच्या आधारकार्डवर महिलेचा फोटो

तरुणाच्या आधारकार्डवर महिलेचा फोटो

Next
ठळक मुद्देदुरुस्तीसाठी ७ वर्षांपासून फरफट : शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : यंत्रणेकडून झालेली चूक तरूणासाठी अभिशाप ठरत असून यामुळे संबंधित तरूण रोजगार व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचीत ठरत असल्याचा प्रकार तालुक्यातील ग्राम झांजिया येथे घडत आहे. झालेल्या चुकीची दुरूस्ती व्हावी यासाठी हा तरूण मागील ७ वर्षांपासून फरफटत आहे. मात्र त्याला फक्त कारणे सांगून टोलविले जात असल्याचे बघावयास मिळत आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील ग्राम झांजिया येथील निलेशकुमार बोपचे (३२) याने एमए-बिएडचे शिक्षण घेतले आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार त्याने सन २३ एप्रील २०११ रोजी आधारकार्ड तयार केले. मात्र या आधारकार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, अंगठ्याचे ठसे बोपचे याचे असून फोटो मात्र गावातीलच ६० वर्षीय महिला फुलनबाई गोवर्धन चौधरी यांचे लावण्यात आले आहे.
सेतु केंद्र संचालकांकडून झालेल्या या चुकीचे भुगतमान मात्र निलेश बोपचे या तरूणाला भोगावे लागत आहे. आज प्रत्येकच कामासाठी आधारकार्ड गरजेचे आहे. बँक खाते, रेशन, नोकरी, कर्ज तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी अगोदर आधारकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बोपचे हे उच्च शिक्षीत आहेत. मात्र त्यांच्या आधारकार्डमध्ये चुका असल्याने त्यांना शासनाच्या योजनांचा फायदाच घेता येत नाही.
यामुळे आधारकार्डवरील महिलेचा फोटो हटविण्यासाठी मागील ७ वर्षांपासून ते आधार केंद्र हेल्पलाईन क्र मांक १९४७ वर संपर्क करीत आहेत. अनेकवेळा आधारकार्ड तयार करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र त्या आधारकार्डवरील महीलेचा फोटो हटविण्यात आला नाही.
विशेष म्हणजे, २ वर्षांपूर्वी त्या महिलेचा मूत्यु झाल्याची माहीती बोपचे यांनी दिली घडलेल्या प्रकारबाबत त्यांनी मुंबईच्या हेल्पलाईन लँडलाईन क्र मांकाव्२ार अनेकदा संपर्क केला. मात्र या क्र मांकावर संपर्कहोवू शकला नाही. त्यामुळे आधारकार्ड तयार करणाऱ्या केंद्राला ई-मेल आय डी वर माहीती देण्यात आली.
पण यात सुधारणा न करता प्रक्रि येत असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. यंत्रणेच्या चुकीचा अभिशाप मात्र बोपचे यांना भोगावा लागत आहे.
यामुळे त्यांनी झालेल्या चुकीची दुरूस्ती करून नवीन आधारकार्ड तयार करण्याकरीता ४ आॅक्टोबर रोजी नोंदणी केली आहे. नवीन आधारकार्ड तयार क रून द्यावा अशी मागणी बोपचे यांनी केली आहे.
वैयक्तिक जीवनावरही पडतोय परिणाम
आधारकार्ड मधील चुकीमुळे बोपचे यांचे बँक खातेही उघडता आले नाही. शिवाय या चुकीमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ ही घेता येत नाही. अशात त्यांना वेठबिगार काम करावे लागत आहे. त्यामुळे ३२ वर्षे वय होवुनही त्यांचे लग्नही होत नाही. एमए-बिएडचे शिक्षण घेवुनही त्याचा उपयोग होत नसून एका चुकीचा परिणाम त्यांच्या वैयक्तीक जीवनावरही पडत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Photo of the woman on the basis of the Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.