स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:46 PM2019-01-10T23:46:54+5:302019-01-10T23:48:02+5:30

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे.

Physical and intellectual development through indigenous sports | स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

googlenewsNext
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुकास्तरीय स्वदेशी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. कारण स्वदेशी खेळ कमी खर्चाचे व मेहनती असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कारंजा येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.९) आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित होत्या. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ प्रत्येकच विद्यार्थ्याला त्याची योग्यता दाखविण्याची संधी देते. तेथेच पुरस्काराच्या माध्यमातून मंडळ उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना सन्मानीत करते. यातूनच अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून तेच भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना अधीक योग्यरित्या तयार करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला योगराज उपराडे, माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, स्नेह गौतम, धनवंता उपराडे, महेंद्र शहारे, विजय बन्नाटे, प्रकाश रहमतकर, विमल नागपुरे, रजनी गौतम, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, कुंदन कटारे, खुशबू टेंभरे, भोजराज चुलपार, ओमप्रकाश भक्तवर्ती, इंद्रायणी कावळे, प्रिया बंसोड, प्रकाश डहाट, अखिलेश सेठ, जयप्रकाश बिसेन, किर्ती पटले, सुनिता दोनोडे, छाया दसरे, शामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, निता पटले, अनिल मते, विनिता टेंभरे, प्रमिला करचाल, प्रकाश देवाधारी, प्रकाश पटले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करणारे शिक्षकच
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले. त्यांनी देशाच्या निर्मितीची दशा व दिशा तय करण्याचा दम ठेवणारे शिक्षकच असतात. ते ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षित करतात, त्याचप्रकारे येणारा देश बनणार. यामुळे प्रत्येकच शिक्षकाने अत्यंत गंभीरता व पूर्ण निष्ठेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: Physical and intellectual development through indigenous sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.