कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे ट्रक पकडले

By admin | Published: September 13, 2014 01:59 AM2014-09-13T01:59:56+5:302014-09-13T01:59:56+5:30

नवेगावबांध पोलीस ठाणे परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारच्या पहाटे जनावरांना कत्तलखान्यात नेणारे तीन ट्रक पकडून नवेगावबांध पोलिसांच्या स्वाधीन केले.

The pickup of the cattle in the slaughter house was captured | कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे ट्रक पकडले

कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे ट्रक पकडले

Next

गोंदिया : नवेगावबांध पोलीस ठाणे परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारच्या पहाटे जनावरांना कत्तलखान्यात नेणारे तीन ट्रक पकडून नवेगावबांध पोलिसांच्या स्वाधीन केले. या तीन वाहनातून ५८ जनावरांची सुटका करण्यात आली. तर ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण नावडकर व त्यांच्या चमूने सदर कारवाई केली. महिद्रा पिकअप एमएच ३०/एबी-२५९८ मध्ये ११ बैल डांबून वाहतूक करणाऱ्या आशिफ मोहम्मद खा पठाण (३६) व अब्दुल मोबीन अब्दुल वहीद (२०) दोन्ही रा. मूर्तीजापूर अकोला यांना नवेगावबांध येथील टी-पार्इंट येथे अटक केली.
पहाटे ३.३० वाजता ते या वाहनात जनावरे डांबून वाहतुक करीत होते. पकडलेल्या वाहनाची किंमत २ लाख तर जनावरांची किंमत ५० हजार सागितली जाते. सदर आरोपीवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) सह कलम ६, ९ महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा, ८३, १७७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रात्री २.३० वाजता ट्रक एमएच ३०/एपी-१५५६ व एमएच ३१/एपी-७१४४ या दोन वाहनांमध्ये ४५ बैल व दोन रेडे असे ४७ जनावरे डांबून वाहतूक करीत असताना चौघांना अटक करण्यात आली. त्या जनावरांची किंमत ३ लाख ७५ हजार तर दोन वाहनांची किंमत १ लाख रुपये सांगीतली जाते.
या प्रकरणात आरोपी इमरान अजित खा पठान (३६), सहजहा खान किस्मत उल्लाखा पठान (२४) दोन्ही रा. मूर्तीजापूर, मोबीन गणी शेख (२८) व विलास निळू वरठी (३०) दोन्ही रा. अड्याळ पवनी जि.भंडारा यांना अटक केली.
सदर आरोपीवरही प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) सह कलम ६, ९ महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा, ८३, १७७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)'

Web Title: The pickup of the cattle in the slaughter house was captured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.