डुक्कर पकडणाऱ्यांची कुत्र्याच्या मालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:39+5:302021-07-12T04:18:39+5:30

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मानवता शाळेजवळ, भीमनगररोड श्रीनगर गोंदिया येथे १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पाच ...

Pig catchers beat dog owner | डुक्कर पकडणाऱ्यांची कुत्र्याच्या मालकाला मारहाण

डुक्कर पकडणाऱ्यांची कुत्र्याच्या मालकाला मारहाण

Next

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मानवता शाळेजवळ, भीमनगररोड श्रीनगर गोंदिया येथे १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पाच आरोपी हे डुक्कर पकडत होते. ते डुकरे पकडत असताना वासुदेव बलराम केशवानी (४३, रा.मानवता शाळेजवळ, भीमनगररोड, श्रीनगर, गोंदिया) यांच्या घरची कुत्रे आरोपींवर भुंकले. त्यामुळे आरोपींनी कुत्र्याला दगडाने मारहाण करीत होते. यावेळी रौनक वासुदेव केशवानी याने आरोपींना कुत्र्याला का मारता असे म्हटले असता पाच आरोपींनी रौनकला शिवीगाळ करून गालावर झापडाने मारले. दोन्ही हातांवर काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले. मुलाला वाचविण्यासाठी वासुदेव बलराम केशवानी (४३) गेले असता आरोपींनी दगडाने मारहाण केली. तो वाद सोडविण्यासाठी प्रिया केशवानी आल्या असता त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत फेकून मारले. नंतर ठार करण्याची धमकी देण्यात आली. पाच आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४ ३३६,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सपाटे करीत आहेत.

Web Title: Pig catchers beat dog owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.