रुग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:07 PM2018-01-14T21:07:58+5:302018-01-14T21:08:09+5:30

रुग्ण आजारी पडल्यानंतर उपचार घेऊन बरा होण्यासाठी तो रुग्णालयात जातो. पण, येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरातील केरकचऱ्याचे ढिगारे आणि आवारात वाढलेला डुकरांचा वावर यामुळे येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pigs in the hospital premises | रुग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर

रुग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर

Next
ठळक मुद्देप्रवेशव्दारासमोर कचऱ्याचा ढिगारा : रुग्णांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रुग्ण आजारी पडल्यानंतर उपचार घेऊन बरा होण्यासाठी तो रुग्णालयात जातो. पण, येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरातील केरकचऱ्याचे ढिगारे आणि आवारात वाढलेला डुकरांचा वावर यामुळे येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने गोंदिया येथे बाई गंगाबाई हे स्वंतत्र महिला व बाल रुग्णालय सुरू केले. तसेच गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे या रुग्णालयाचे महत्त्व अधिक वाढले.
या रुग्णालयात दररोज जिल्हाभरातून तीनशे ते चारशे रुग्ण उपचारासाठी येतात. एकमेव महिला व बाल रुग्णालय असल्याने गोरगरिबांना मोठा आधार होतो. मात्र येथील रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
सध्या हे रुग्णालय केरकचरा आणि डुकरांचा वावर वाढल्याने चर्चेत आहे. या रुग्णालयाचा फेरफटका मारला असता रुग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर मोठ्या प्रमाणात केरकचऱ्याचे ढिगारे पडले असून रुग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर असल्याचे आढळले. रुग्णालयातील सांडपाण्याचा निचरा होणाºया नाल्या सुध्दा चोक झाल्या असल्याने त्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवरील पाणी टाकी जीर्ण झाली असून त्यातून दिवसभर पाणी झिरपत असते. रुग्णालयातील स्वच्छता विषयक बाबीकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथे उपचारार्थ दाखल होणाºया रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांची अरेरावीची वागणूक
येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयात जिल्ह्यातील दूरवरुन गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मात्र रुग्णालयात आल्यानंतर येथील कार्यरत कर्मचाºयांकडून त्यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. जेव्हापर्यंत एखाद्याचा वशिला लावला जात नाही. तेव्हापर्यंत रुग्णांवर वेळीच उपचार केला जात नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यानंतरही कुठलीच सुधारणा झालेली नाही.
जबाबदारी नेमकी कुणाची
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता आणि रुग्णालयाच्या आवारात वाढत चालेला डुकरांचा वावर यासर्व गोष्टींकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या समस्या मार्गी लावण्याची नेमकी जबाबदारी कुणाची असा सवाल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Pigs in the hospital premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.